The world is a dangerous place to live; not because of the people who are evil, but because of the people who don't do anything about it. Remember, "Change occurs not by big miracles but by acts within reach of common man" and you can be one of them. May these examples guide you how to serve Dharma, the Nation and finally Humanity at large.

मला काय त्याचे?

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा
िशरीयश िचरंजीव अखंिडत राजलषमी अलंकृीत राजमानय राजषृी िशरीमंत िशरी छञपती िशवरायां चरणी िञवार मानाचा मुजरा !!

निश्चयाचा महामेरु,बहुत जनांसी आधारु,अखंड स्थितीचा निर्धारु,श्रीमंतयोगी!
यशवंत,किर्तिवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत,जाणता राजा!
आचारशीळ,विचारशीळ,दानशीळ,धर्मशीळ,सर्वज्ञपणें सुशीळ,सकळां ठायी!
धीर,उदार,गंभीर,शूर त्रियेसी तत्पर,सावधपणें नृपवर तुच्छ केले !
कित्येक दुष्ट संहारिला,कित्येकांस धाक सुटला,कित्येकांसीं आश्रयो जाला,शिवकल्याणराजा!
शिवराजास आठवावें,जीवित तृणवत् मानावें,इहलोकी परलोकीं राहावें,कीर्तिरूपें!
शिवरायाचें आठवावें रूप,शिवरायाचाआठवावा साक्षेप, शिवरायाचा आठवावा प्रताप,भूमंडळीं!
शिवरायाचें कैसें बोलणें,शिवरायाचें कैसें चालणे,शिवरायाची सलगी देणें,कैसी असे!
सकळ सुखाचा केला त्याग,करूनि सधिजे तो याग,राज्य साधनाची लगबग,कैसी केली!
त्याहुनी करावें विशेष,तरीच म्हणवावेंपुरुष,याउपरीं आतां विशेष,काय लिहावें?

शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मामधील चांगल्या माणसाना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले.मराठा,ब्राह्मण,प्रभु,भंडारी,कोळी,आगरी,महार,रामोशी,मुसलमान या सर्वांमध्ये शिवाजी महाराजांनी एकी निर्माण केली ,आपसात भांडता शत्रुविरुध्द लढण्यास शिकवले,आणि हिंदवी स्वराज्य बलाढ्य केले!आपले आजचे भारताचे स्वराज्यहि बलाढ्य करण्यासाठी आपण आपापसातील भांडणे बंद करुन अतिरेकी आणि शत्रु विरुध्द लढले पाहिजे.

"भा' म्हणजे तेज आणि "रत' म्हणजे नित्य पूजन करणे. तेजाचे पूजन करणारा तो भारतीय. नुसताच भारतात राहणारा असे नव्हे! जी संस्कृती असा दिव्य संदेश देते, तिच्या देशात मात्र विमान पळविण्याच्या बदल्यात अतिरेकी सोडले जातात आणि संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझलचे काय करावे यावर चर्चासत्रे झडतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांची पिळवणूक, जातीय द्वेष, धार्मिक दंगली, निष्पापांच्या हत्या, बलात्कार, वाढती महागाई, बॉम्बस्फोट, काश्मिरातील जवानांचे मृत्यू, वाढते आघात हे सर्व प्रगतीचे लक्षण खचितच नाही. दुष्ट आणि दुर्जनांची हिंमत वाढते आहे. कारण सज्जन निष्क्रिय बनले आहेत. दुष्ट हे नेहमी संघटित असतात. कारण आपण जे करीत आहोत ते योग्य नव्हे, याची त्यांना पुरेपूर कल्पना असते. याउलट सज्जन नेहमीच विस्कळित असतात.


काय? काय सांगू मी?....कोण ऐकेल? किती जणांना आज फरक पडेल? मला माहीत नाही.....मला काही काही पहावत नाहिए...काय काय पाहू मी?

लुप्त होत चाललेला माणसा माणसांवरचा विश्वास?
राष्ट्राभिमान विसरलेले राष्ट्र?
ध्यास... अहं... हव्यास घेतलेले राज्यकर्ते?
पुढचं भविष्य सोडाच हो...पण पाठचा इतिहासही बघणारे अंध?

कसं पाहू हे सर्व...काळजात ठेवलेले प्राणापलिकडे जपलेले माझं...आपलं..स्वराज्य...आज...काळजाचे तुकडे होत आहेत माझ्या..प्राण असते तर आलो असतो तसाच भवानी हाती धरुन...पण...पण...ती ही कुठे दिसत नाही...खरच

आज स्वतंत्र आहात तुम्ही पण.. स्वराज्य आहे का?

मला माहित आहे...माझ्या काळजाचा एक तुकडा तुमच्या काळजात आहे... एक करा मला... एक व्हा...स्वराज्य बनवा...आणि स्वराज्याचा भगवा फडकवा...एकच...एकच शिवा....शिवा पाहीजे !!

दहशतवादाचा आलेख दुर्देवाने दिवसेंदिवस वाढत आहे.१९९०ते२००५ या १५ वर्षात दहशतवादाचे बळी ४७,३७१ आहे.प्रत्येकवेळी सरकारने पाकिस्तानकडे बोट दाखवले प्रत्येकवेळी परकिय शक्तिंवर खापर फ़ोडले जाते. राजकिय नेते दहशतवाद संघटनांना जरब बसेल असे क्रुत्य करण्यापेक्षा एक भ्याड क्रुत्य अशी सम्भावना करने,भारताची धर्मिक एकत्मतेला धक्का लागनार नाहि अशि ग्वाहि देने,- लखांची मदत जाहिर करने,मेणबत्या लावुन निर्धार व्यक्त करने,परिसंवाद भरवुन मानवी हक्कांची चर्चा करुन वेळ मारुन नेलि जाते या नेत्यांच्या भरवशावर बसले तर हा देश दहशतवादाच लाटेखाली बुडेल.

_w¨~B© aoëdo ~m°å~ñ\moQ A[VaoŠ`m¨Mo H«ya H¥Ë`

_w¨~B©Vrb ~m°å~ñ\moQm¨Mr gmIir. `m_Ü`o EHhr [MWmdUrImoa, amÁ`HVm©, Jw¨S, nwTmar, XheVdmXr, ham_Imoa Rma Pmbm Zmhr. KamÀ`m AmoTrZ¨ [Xdg^a Hm_ HéZ Whbobo- ^mJbobo HïHar, H_©Mmar, gmZ-Wmoa Ë`m¨À`m Aëbm- B©ída-`oewZo Z ~mobmdVmM AmV¨HdmÚm¨À`m ~m°å~Mo ~ir Rabo.

आता सर्व मतभेद बाजूला ठेवून या अतीरेक्यांचा सर्वनाश करायची वेळ आलीच आहे. एक प्रश्न मला खरच मुंबईकरांना विचारावासा वाटतो की किती दिवस " आम्ही फार सहनशील आहोत, मुंबईकरांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, मुंबई चटकन सावरली " अशा शब्दांनी हुरळून जाऊन पुढचे सोपस्कार टाळणार आहात?

का सहन करताय? काल कार्यालये आज रेल्वे अन उद्या? उद्या तुमच्या घरापर्यंत येतील हो हे नराधम. आवरा त्यांना.


रस्ता, घर, वाहन, संपत्ती सर्व प्रकारचे कर भरता तुम्ही, तो भरलाच पाहिजे अशी जाणिव तुम्हाला सरकार दुरदर्शन अन खाजगी वाहन्यांवरुन जाहिरातींद्वारे वारंवार करुन देते मग तुमच्या मनमोकळ्या जगण्याच्या आधिकाराचे, सुरक्षेचे काय? तो कर कोण भरणार?

सरकारला जाब विचारणे हा तुमचाही अधिकार ना? तो या निर्लज्ज मंत्र्या संत्र्यांवर का सोपवताय? का जाणुन घेत नाही तुमचे अधिकार? की फक्त दैनंदिन गप्पातच एकमेकाशी बोलुन सरकारला शिव्या घालायच्या? एकदा निवडुन दिलेल्या आमदार खासदाराला परत बोलवता येत नाही म्हणे, मग तो जर असा अकार्यक्षम ठरत असेल तर एक होऊन धडा शिकवा त्याला.


नुसती आमची मुंबई नको हो. ही मालिका चालू राहू नये असे वाटतय ना? मग सरकारला तुमचे अन तुमच्या हितांचे, घराचे संरक्षण करायला भाग पाडा. वर्तमानपत्रांनी किती कंठशोष केला तरी लोक दुर्लक्ष करीत आहेत अन करतील हीच भिती आहे. सहनशीलता सोडा अन काही निर्णय घ्या.

अब होगी प्रार्थना, होगी याचना...
अब रण होगा,
जीत होगी या अंत होगा...

मराठी माणसाला बिहारी भैयापेेक्षा ३५० वर्षे जुलमी राज्य करनारे, धर्मांतरे करनारे आपल्या आई,बहिणीवर हात टाकनारे अतिरेकी आणी १५० वर्षे धर्मांतरे करनारे मिशनरी जवळचे वाटु लागले आहेत काय?
शिव छत्रपतिंनी जे हिंदवी स्वरज्य व्हावे अशि इछा व्यक्त केली ति मराठी माणुस पुर्ण करनार आहे कि नाही यावर प्रश्नचिन्ह आहे कारण देशामधे वारंवार दहशदवादी हल्ले करनारे अतिरेक आणी धर्मांतरे करनारे मिशनरी हा एक प्रश्न आहे हेच लोकांना समजले नाही. अरे अखंड हिन्दुस्तानमधिल पकिस्तान गेला,बांगलादेश गेला, कश्मिर गेला, गेला तरी मराठी माणुस आपल्याच समाजाचा एक भाग असलेल्या बिहरी लोकांशी का भांडत बसला आह. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि तर शिव छत्रपतिंची इछा आहे आणी मराठी माणूस तो पुर्ण नक्कि करेल.


पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?


जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?


या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...

मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...
आणि आपले रोजच ...
कुढत कुढत मरायचे

आमचे देशप्रेम सरले का???

शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
किती ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.

घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र भारत-पाक
मैत्रिचे पुल बांधणार

वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.

त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???

त्यांनी मारायचे..आम्ही बघायचे
इतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का??

सशक्ता आणी सशसत्र भारत बनविणे हे माझे स्वप्न आहे

।। स्वप्न आजचे, सत्य ऊद्याचे
या सत्येला पंख विजयाचे ।।


।। जय हिंद ।।
।। जय भारत||

1 comment:

Deshbhakta said...

Dear Shakti

It is great to find your blog exposing Hussain. Please provide a reference link to original post of these photos i.e.

http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-campaign/

This is from Hindu Janajagruti Samiti website. I am regular reader and fan of this website and your link will help to build a network of Hindus fighting for same cause.

Best Wishes